महाराष्ट्रात म्युकोरमायकॉसिसचे उपचार मोफत

महाराष्ट्रात म्युकोरमायकॉसिसचे उपचार मोफत

महाराष्ट्रात कोविडची संख्या वाढतीच राहिली होती. मात्र कोविडमधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांत म्युकोरमायकॉसीस या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढते आहे. बुरशीच्या आजारांवरील उपचार प्रचंड महाग असतात. मात्र ठाकरे सरकारने या आजारावरील उपचार मोफत करणार असल्याची माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

मुंबईतील रुग्ण पुण्यात पाठवणे हेच मुंबई मॉडेल?

एकाच व्यक्तीला दोन वेगळ्या लसींचे डोस

तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

कोविडमुळे रोगप्रतिकारशक्ती खालावते. त्यामुळे म्युकोरमायकॉसिस हा आजार अनेक सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये आढळून येतो. हा आजार बुरशीमुळे होणारा असल्याने, याची प्राणघातकता देखील खूप जास्त आहे. त्याबरोबरच हा आजार खर्चीक देखील आहे. मात्र ठाकरे सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या आचारावरील उपचार मोफत करणार असल्याचे घोषित केले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरून ही माहिती दिली होती.

अधिक जाणून घ्या म्युकोरमायकॉसिस बद्दल…..

म्युकोरमायकॉसिस हा बुरशीजन्य आजार असल्याने रोगप्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रूग्णांना याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांत हा आजार सहज होतो. याची सुरूवात नाकापासून होते. नाकावर काळा ठिपका उमटतो, तिथून हा आजार गाल आणि जबड्यात पसरतो. हा आजार फुप्फुसांपर्यंत आणि मेंदूपर्यंत देखील वेगाने पोहोचतो. फुप्फुस आणि मेंदूत पोहोचलेल्या रुग्णांच्या वाचण्याची शक्यता अगदी कमी असते. त्या वेळेस या आजाराची प्राणघातकता ९८ टक्क्यांपर्यंत वाढलेली असते, आणि दुर्दैवाने रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास सुमारे ५० टक्के रुग्णांत हा आजार विक्राळ रुप धारण करू शकतो. हा आजार टाळण्यासाठी कोविडप्रमाणेच हात धुणे, नियमित आहार, पुरेशी झोप घेऊन आरोग्य चांगले राखणे हेच उपाय करता येतात.

Exit mobile version