पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना ठाकरे सरकार पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त होते. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यावरुन राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
“ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देत आहे, ताकद देत आहे. इथे कुंपणच शेत खात आहे. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियान आणि आता पूजा चव्हाण प्रकरणातसुद्धा तेच होत आहे. एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार पटाईत आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर बलात्कार, हत्या सारखे गंभीर आरोप झाले. पण ठाकरे सरकारकडून सगळ्यांना अभय देण्याचं काम सुरु आहे.” अशी टीकाही राणेंनी केली. त्याचबरोबर, “या लोकांना अत्याचार करायला लायसन्स दिलंय का?” असा सवालही राणेंनी विचारला आहे.
हे ही वाचा:
“राजीनामा दिला म्हणजे काही उपकार नाही, आता गुन्हा दाखल करा”- निलेश राणे
यापूर्वी निलेश राणे यांनी सुद्धा संजय राठोड प्रकरणात, “राजीनामा दिला म्हणजे काही उपकार केले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाई करा” असे म्हणत उद्धव सरकारवर टीका केली होती.