७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त बुस्टर धमाका!

७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त बुस्टर धमाका!

भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. या आझादीच्या अमृत महोत्सवच्या निमित्ताने मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना पुढील ७५ दिवसांसाठी बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज, १३ जुलै रोजी ही दिली आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १५ जुलैपासून पुढचे ७५ दिवस देशातील १८ वर्षांवरील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

हे ही वाचा:

पोक्सो अंतर्गत तक्रार आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश

मुंद्रा बंदरावर ३७६ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

राज्यासह मुंबईत पावसाची दमदार हजेरी; वसईत दरड कोसळून दोन जण अडकले

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ झाला असेल, अशा व्यक्ती बुस्टर डोस घेऊ शकतात. याआधी बूस्टर डोससाठी नागरिकांकडून शुल्क घेतले जात होते. यापूर्वी फ्रंटलाइन वर्कर्स, कोव्हिड वॉरिअर्स होते किंवा ६० वर्षांपुढील नागरिकांसाठी हा बुस्टर डोस मोफत दिला जात होता. आता १८ वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस मोफत दिला जाईल, सर्व सरकारी केंद्रांवर हा डोस उपलब्ध असेल, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

Exit mobile version