सीबीआयने म्हणे राहुल गांधींना अहवाल पाठवला, पोगो पाहणारेच यावर विश्वास ठेवतील!

सीबीआयने म्हणे राहुल गांधींना अहवाल पाठवला, पोगो पाहणारेच यावर विश्वास ठेवतील!

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अनिल देशमुख प्रकरणातील आपला अहवाल थेट राहुल गांधी यांनाच पाठविला आहे म्हणे. पोगो पाहणारेच यावर विश्वास ठेवतील. सही शिक्का नसलेला हा अहवाल ज्यांना पाठविण्यात आला आहे, त्यात मोदीविरोधकांचा समावेश आहे. ही देशमुखांना वाचविण्याची अखेरची धडपड आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावर खिल्ली उडविली आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लिन चीट दिली आहे, अशा पोस्ट फिरत असून त्याद्वारे अनिल देशमुख निर्दोष आहेत, असे सांगण्याचा खटाटोप केला जात आहे. मात्र जो अहवाल फुटल्याचा दावा केला जात आहे, त्याखालील लोकांची नावे पाहिल्यानंतर ही अनिल देशमुखांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांची बनवेगिरी असल्याचे समोर येते आहे.

या यादीत राहुल गांधी यांच्यासह न्या. दीपांकर दत्ता, न्या. एस.एस. शिंदे, न्या. धनंजय चंद्रचूड, सीएमओ महाराष्ट्र, सीएमओ पश्चिम बंगाल, सीएमओ पंजाब, ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुक, फाये डिसुझा, इंडिया टीव्ही, रिपब्लिक टीव्ही, आज तक, द वायर, द प्रिंट, द क्विंट, करण थापर, टीव्ही ९ भारती, पत्रकार आशीष जाधव, संजय आवटे, अभिसार शर्मा, साकेत गोखले, रवीश कुमार, कार्ती चिदंबरम, यशवंत सिन्हा, लाइव्ह लॉ, बार अँड बेंच यांचा समावेश असल्याचे दिसते आहे.

हे ही वाचा:

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला

‘पब्जी’तून लाखो गमावणारा मुलगा अखेर सापडला!

कोरोनाचाचणीच्या प्रमाणपत्राचे गणेशभक्तांपुढे विघ्न

यावरून हे स्पष्ट होत आहे की, ही बातमी पेरण्याचा आणि अनिल देशमुखांप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण हा अहवाल फोडताना तो अहवाल ज्यांना पाठविला गेला आहे, त्यांची नावे समोर आल्यामुळे सगळेच बिंग फुटले आहे.

Exit mobile version