उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज, १० ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज, १० ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. मुलायम सिंह यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

दिल्लीतील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर २२ ऑगस्टपासून आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मुलायमसिंह यादव यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती खालवत होती. मुलायम सिंह यादव यांचा मुलगा आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे मेदांता रुग्णालयात उपस्थित होते, अशी माहिती आहे.

हे ही वाचा:

चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच

अय्यरचे दुसरे शतक, किशनची पहिलीच मोठी खेळी आणि भारताचा विजय

उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर

अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल

मुलायम सिंह यादव यांची ओळख म्हणजे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक अशी होती. ४ ऑक्टोबर १९९२ रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. मुलायम सिंह यादव हे तीन वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. काँग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्त आघाडीने सरकार स्थापन केले. तेव्हा एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले.

Exit mobile version