24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमाजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन

राजकीय विश्वात शोककळा

Google News Follow

Related

जनता दल युनायटेडचे ​​माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे निधन झाले आहे. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात गुरुवारी रात्री शरद यादव यांचे वयाच्या ७५ व्य वर्षी प्राणोत्क्रमण झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मुलीने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील छतरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. शरद यादव यांच्या निधनाने संपूर्ण राजकीय विश्वात शोककळा पसरली आहे.

शरद यादव यांची मुलगी शुभशिनी यादव हिने ट्विट करून वडिलांच्या निधनाची माहिती दिली. शुभशिनीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘पापा आता नाही.’ ते गेल्या काही दिवसांपासून दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. शरद राव यांना हृदयविकाराचा झटका आला, आम्ही त्यांना रुग्णालयात नेले. तेथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना किडनीचा त्रास होता आणि ते डायलिसिसवर होते. त्यांचे पार्थिव मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असून तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असल्याचे शरद यादव यांचे जावई राज कमल यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

शरद यादव यांचा जन्म १ जुलै १९४७ रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील बंदई गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या शरदला वाचनात आणि लेखनात खूप तडफ होते. विद्यार्थी राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवणाऱ्या शरद यादव यांनी बिहारच्या राजकारणातही मोठे स्थान मिळवले होते. शरद यादव यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि नंतर बिहारमध्ये आपले राजकीय स्थान निर्माण केले होते . नितीश कुमार यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी जेडीयू सोडली होती. बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातून ते अनेकदा खासदार झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा