महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात आपल्याला राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मूक्त करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. कोश्यारी यांनी यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र देखील लिहिलेले होते. कोश्यारी यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात उमटसुलट चर्चाही सुरु झाली होती. कोश्यारीनंतर राज्यपाल पदावर कोणाची नियुक्ती होणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता राज्यपाल क्षणी पदमुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोश्यारी यांच्या जागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस राज्यपालांनी व्यक्त केली होती. राज्यात २०१९ सालातील महाविकास आघाडीची सत्ता त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होईपर्यंत राज्यपाल चर्चेत राहिले. आपली विधाने आणि भूमिका यामुळे कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा कार्यकाळ कायम वादग्रस्त ठरला. विरोधकांकडून सातत्याने राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता राज्यपाल पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवणार याची चर्चा सुरु झाली. पण आता राज्यपालम पदासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे येत असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन
१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी
लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण
पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सिंग नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते पटियाला येथून विधानसभेचे निवडून आलेले सदस्य आणि पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही होते. यापूर्वी २००२ ते २००७ पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबादारी पार पडली आहे.सिंग यांचे वडील पटियाला संस्थानाचे शेवटचे महाराज होते. १९६३ ते १९६६ या काळात त्यांनी भारतीय सैन्यातही काम केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले. १८ सप्टेंबर२०२१ रोजी कॅप्टन सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.