27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारणमाजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

Google News Follow

Related

उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे.

आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून ते निवडून यायचे. परंतु अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. दरम्यान त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ईडीने केलेल्या कारवाईवेळी आणि आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

राजीनाम्यानंतर आनंदराव अडसूळ एकनाथ शिंदेंसोबत जाणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हा आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’

नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक

‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’

वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मत करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आमदारांनंतर खासदारांच्या मनातील नाराजी बाहेर येऊ लागल्याचं चित्र आहे.

दुसरीकडे शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शाखा क्रमांक ३ चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक १२ चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा