काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत १४० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. यावेळी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती नदीत उडी मारून लोकांचे प्राण वाचवत होता. त्या व्यक्तीच्या कामगिरीबद्दल भाजपाने त्यांना मोठे बक्षीस दिले आहे.
नदीत उडी मारून प्राण वाचवणारी व्यक्ती गुजरातचे माजी आमदार कांतीलाल अमृतिया हे आहेत. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीमध्ये उडी मारून लोकांचे प्राण वाचवायला सुरुवात केली होती. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या या कामगिरीची दखल भाजपाने घेतली असून, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. मोरबीमधून कांतीलाल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याचवेळी मोरबी दुर्घटनेवेळी लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागल्यामुळे भाजपाने ब्रिजेश मेरजा यांचे तिकीट कापल्याचे म्हटले जातं आहे. मोरबी दुर्घटनेमुळे संपूर्ण देश अस्वस्थ झाला होता. मात्र, दुर्घटनेच्या ठिकाणी ब्रिजेश मेरजा न दिसल्याने लोकांमध्ये त्यांच्याविरोधात राग होता.
कांतीलाल अमृतिया १९९५ पासून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. २०१७ मध्ये काँग्रेसच्या ब्रिजेश मेरजा यांनी त्यांचा पराभव केला होता. नंतर मेरजा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत ब्रिजेश मेरजा यांचा विजय झाला होता व त्यांना मंत्री करण्यात आले. मात्र, मोरबी दुर्घटनेत ब्रिजेश मेरजा यांच्यावर लोकं नाराज आहेत. तर कांतीलाल यांच्या कामगिरीमुळे त्यांना तिकीट देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?
मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी
संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने बुधवार, ९ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.