शिवाजीनगरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक निम्हण यांचं निधन झालं आहे. आमदार निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. विनायक निम्हण यांना प्रकृती अस्वास्थ्यानंतर औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील एम्स रुग्णालयात दुपारी दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. निम्हण यांच्यावर आज रात्री पाषाण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
निम्हण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निम्हण यांनी १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे निम्हण यांनी शिवाजीनगरमधील आपले आमदारपद कायम राखलं होतं. पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते. विनायक निम्हण महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य होते.
हे ही वाचा:
बॉल समजून मुलं बॉम्बशी खेळत होती.. जीवावर बेतले
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज
मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी
माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिट्ठी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यावेळी निम्हण हे देखील काँग्रेस प्रवेश करणाऱ्यांपैकी एक प्रमुख होते. नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. नारायण राणे यांबरोबर त्यांचे निकटचे संबंध होते. २०१५ मध्ये तब्बल १० वर्षांनी त्यांनी घरवापसी केली . निम्हण यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश करत पुन्हा शिवबंधन बांधले होते. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पाषाण स्मशानभूमीत रात्री नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रात्री पाषाण स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.