माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचे निधन

रुग्णालयात सुरु होते उपचार

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचे निधन

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांचे निधन झाले आहे . पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आजारी पडल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या ८९ व्य वर्षी शुक्रवारी सकाळी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

माजी आमदार देवीसिंह शेखावत यांच्यावर संध्याकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा राजेंद्रसिंह शेखावत, जे काँग्रेस नेते आहेत आणि इतर नातेवाईक आहेत.  दोन दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला . देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह ७ जुलै १९६५ रोजी झाला होता. शेखावत हे अमरावतीचे पहिले महापौर होते.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

देवीसिंह शेखावत या शिक्षण क्षेत्रातही खूप काम केले होते. . १९७२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली. विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य होते. अमरावतीचे महापौर होण्याबरोबरच ते १९८५ मध्ये अमरावतीमधून आमदार म्हणून निवडून आले होते.

 

Exit mobile version