माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे निधन झाले. कोपरगाव येथे राहत्या घरी शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

कोपरगाव तालुक्यात सहकारी आणि शिक्षण संस्थांचं जाळं निर्माण करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली. सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे सासरे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आजोबा आहेत. गोदावरी (खोरे) सहकारी दूध संस्था, यशवंत पोल्ट्री, देवयानी सहकारी बँक लि. कोपरगाव उभारण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं.

हे ही वाचा:

महाराष्ट्र गुजरात सीमावाद लवकरच संपणार

काँग्रेसला धक्का देत शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल

गांधी कुटुंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडावे!

पंतप्रधान मोदी म्हणतात की, काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनत राहिले पाहिजेत!

शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा परसली आहे. सहकारातील महान व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. येत्या २१ मार्चला शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version