काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश!

शिंदे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांचाही भाजपात प्रवेश

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश!

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील आणि सोलापुरातील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी आज ( २७ फेब्रुवारी) रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता.यानंतर बसवराज पाटील यांच्या प्रवेशाने काँग्रेसला चांगलाच फटका बसला आहे.दरम्यान, बसवराज पाटील यांच्या काँग्रेस सोडण्यामागे चव्हाण यांचाच हात असल्याचे बोलले जात आहे.

भाजप पक्षात प्रवेश करण्यापूर्वी बसवराज पाटील यांनी आज विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.बसवराज पाटील यांचा भाजपात प्रवेश होण्यापूर्वी काँग्रेस नेते नाना पाटोले यांनी पक्षप्रवेशाच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.मात्र, अखेर बसवराज पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.बसवराज पाटील मराठवाड्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. लिंगायत समाजातील एक प्रबळ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.तसेच सोलापुरातील बागल गटाच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा:

ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना आठवे समन्स!

डाव्यांना केरळमधून कॉंग्रेसची हकालपट्टी करायची आहे

अजित पवारांकडून सभागृहात महिलांची ताकद दर्शवणारी शेरो शायरी

अनंत अंबानीचा “वनतारा”, हत्तींपासून वाघापर्यंत मिळाले अत्याधुनिक घर!

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर बसवराज पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे संपूर्ण देशामध्ये चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे.विकसित भारत म्हणून आज मोदींच्या नेतृत्वाच वाटचाल सुरु आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.देशात त्यांच्यामागे मोठी शक्ती उभे करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, त्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे बसवराज पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी ४० वर्षे काँग्रेसमध्ये घालविली आहेत.पक्षासाठी मी अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे.त्याच निष्ठेने मी भाजप पक्षात काम करत राहीन.माझी कोणाबाबत तक्रार नसल्याचे बसवराज पाटील म्हणाले.तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येईल, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्व करत आहेत.या विचाराने मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बसवराज पाटील म्हणाले.

काँग्रेस पक्षावर टीका करताना बसवराज पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा राहुल गांधींवर विश्वास राहिलेला नसून लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे.राहुल गांधी देशाचे कधीच भले करू शकत नाहीत.त्यांनी ओबीसी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महाराष्ट्रचा अपमान केलेला आहे.तसेच येत्या काळात पक्ष प्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट दिसणार असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version