मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री २ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विश्वनाथ महाडेश्वर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार
सागरी जगभ्रमणासाठी आता मोहिमेवर निघणार नौदलाची महिला अधिकारी
‘द केरळा स्टोरी’ला विरोध करणारे आयसीसचे समर्थक
गंमतच आहे सगळी!! मुक्त पत्रकारितेच्या बाबतीत अफगाणिस्तान भारतापेक्षा सरस
२०१७ ते २०१९ दरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले होते. विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते. २०९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता.