काँग्रेसच्या माजी महापौर राष्ट्रवादीत

काँग्रेसच्या माजी महापौर राष्ट्रवादीत

एकीकडे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत एकत्र आहेत पण एकमेकांच्या पक्षांचे कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचे काम मात्र सुरूच आहे. दरम्यान मुंबई काँग्रेसच्या पदाधिकारी आणि मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत- प्रभावळकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने काँग्रेसला हा चांगलाच दणका दिला आहे.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये माजी महापौरांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल’

मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

महाराष्ट्रात ‘नाचलेल्या’ सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट

निर्मला सामंत यांच्या आगमनाने मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला अधिक बळ मिळेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार विद्या चव्हाण, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव सुरेश पाटील, माजी नगरसेविका अल्पना पेंटर आदी उपस्थित होते.

दरम्यान, पक्षाच्या शहरी सेलच्या प्रदेशाध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या मान्यतेने निर्मला सामंत यांची पक्षाच्या मुंबई शहरी सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

Exit mobile version