भारतात एकदिवसीय दुखवटा
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवार, ८ जुलै रोजी म्हणजेच आज निधन झाले आहे. शिंजो आबे हे नारा शहरात एका प्रचारसभेत भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि ते अचानक खाली कोसळले. त्यांच्या छातीत गोळी लागली. गोळी लागल्यानंतर आबे यांना कार्डियक अरेस्टचाही त्रास झाला. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने जपानमध्ये खळबळ उडाली आहे.
Sharing a picture from my most recent meeting with my dear friend, Shinzo Abe in Tokyo. Always passionate about strengthening India-Japan ties, he had just taken over as the Chairman of the Japan-India Association. pic.twitter.com/Mw2nR1bIGz
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. २००६ ते २००७ आणि त्यांनतर २०१२ ते २०२० असा प्रदीर्घ काळ ते जपानच्या पंतप्रधान पदी होते. त्यांनी २०२० साली प्रकृतीच्या कारणामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात.
हे ही वाचा:
‘धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार
कल्याण डोंबिवली, पुण्यातही शिवसेनेला खिंडार
संजय पांडेंवर तीन गुन्हे दाखल, सीबीआयची छापेमारी
त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. भारतात शनिवार, ९ जुलै रोजी एक दिवसाचा दुखवटा असणार आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर शिंजो आबे यांच्यासोबतच एक फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.