जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर नारा प्रदेशात एका प्रचार कार्यक्रमात गोळीबार झाला होता. त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबारानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिंजो आबे हे पश्चिम जपानमधील नारा शहरातील एका प्रचारसभेत संबोधित करत होते. भाषण करत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला होता आणि त्यांच्या छातीत गोळी लागली. गोळी लागल्यानंतर आबे यांना कार्डियक अरेस्टचाही त्रास झाला. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. आबे यांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी नारा शहरातील ४१ वर्षीय यामागामी तेत्सुयाला या व्यक्तीला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली आहे.
The moment that Japanese Former PM Shinzo Abe was shot. Looks to be a DIY shotgun. pic.twitter.com/sC0yzzfIob
— Global: MilitaryInfo (@Global_Mil_Info) July 8, 2022
गोळीबारानंतर त्यांच्या कानातून रक्त वाहात होते. हल्लेखोर कोण होता? त्यानं आबे यांना गोळी का मारली हे अद्याप समजलेलं नाही. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘चिन्ह’ जाणार?
पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाराणसीमध्ये १ हजार ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला
पोलिसांनी तेलंगातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक
दरम्यान, शिंजो आंबे हे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. २००६ ते २००७ आणि त्यांनतर २०१२ ते २०२० असा प्रदीर्घ काळ ते जपानच्या पंतप्रधान पदी होते. त्यांनी २०२० साली प्रकृतीच्या कारणामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात.