माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची होणार सीबीआय चौकशी

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची होणार सीबीआय चौकशी

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर लाच दिल्याच्या आरोपाची सीबीआय चौकशी होणार आहे. मलिक यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते, अंबानी यांच्याशी संबंधित फाइल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती असा दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर प्रशासनाने सीबीआयकडे या प्रकरणाच्या चौकशीची शिफारस केली आहे.

राजस्थानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सत्यपाल मलिक यांनी हे दावे केले होते. सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना युनियन आणि बड्या औद्योगिक घराण्यांच्या फायली क्लिअर करण्याच्या बदल्यात ३०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार देत सौदे रद्द केले होते, असे मलिकांनी म्हटले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने सीबीआयकडे या प्रकरणाच्या चौकशीची शिफारस केली आहे.

हे ही वाचा:

‘कोल्हापुरात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता’

…आणि पंतप्रधान मोदींनी केली चित्रकार आयुषची इच्छा पूर्ण

माजी सरन्यायाधीश आर सी लाहोटी यांचे निधन

काश्मीर फाईल्सने जमवला २०० कोटींचा गल्ला! रचला ‘हा’ अनोखा विक्रम

मलिकांनी सांगितले होते की, मी जम्मू-काश्मीरचा राज्यपाल झालो, तेव्हा माझ्याकडे दोन फाइल्स आल्या होत्या. एक फाइल अंबानी संबंधित होती, तर दुसरी आरएसएसचे वरिष्ठ अधिकारी आणि मेहबुबा सरकारमधील एका मंत्र्याशी संबंधित होती. हे नेते स्वत:ला पंतप्रधान मोदींचे जवळचे म्हणायचे. ज्या विभागांच्या या फायली होत्या, त्यांच्या सचिवांनी या फायलींमध्ये गडबड असल्याचे सांगितले होते आणि सचिवांनीही त्यांना या दोन्ही फायलींमध्ये १५०-१५० कोटी रुपये मिळू शकतात, अशी ऑफर दिली होती. मात्र, आपण या दोन्ही फायलींशी संबंधित करार रद्द केला, असे त्यांनी सांगितले होते. सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत.

Exit mobile version