राज्य सरकारकडून सरकार टिकविण्यासाठी सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरूअसल्याचा आरोप करतांनाच शिंदे सरकारवर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मविआच्या बैठकीत बोलताना अनेक टीकेचे बाण सोडले. हे बाण शिंदे गटाच्या वर्मी बसण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांचाच वेध घेत असल्याचे दिसून येत आहे. सुभाष देसाई यांचा पुत्र भूषण ठाकूर यांनी दिलेला धक्का ताजा असतांनाच आता उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनीही उद्धव ठाकरे यांना सोडचिट्ठी दिली आहे.
लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी माविआच्या बैठकीत बोलताना सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्याना टिकवून ठेवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण दुसऱ्याबाजूला त्यांच्या जवळचेच पाठ दाखवत आहेत. अनेक नेते सातत्याने उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी (१३ मार्च) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. आपला मुलगा भूषण देसाई याचे शिवसेनेत काही योगदान नव्हते असे सांगून सुभाष देसाई यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलॆला होता.
हे ही वाचा:
ग्राहक म्हणून तुमचे हक्क तुम्हाला माहिती आहेत का ?
सावधान महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढतोय
अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या
‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन
दीपक सावंत यांच्यामुळे ठाकरे गटाला बसलेला हा दुसरा झटका मानला जात आहे. दोन दिवसापूर्वीच दीपक सावंत यांनी विधानभवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनातील दालनात भेट घेतली होती. मंत्रिपद गेल्यानंतर डॉ. दीपक सावंत हे थोडेसे बाजूला पडले होते असे सांगण्यात येत आहे. दीपक सावंत हे बुधवारी संध्याकाळी बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.