उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरले ईडीचे माजी सहसंचालक

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरले ईडीचे माजी सहसंचालक

सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. यामध्ये उत्तर प्रदेशची निवडणुक सर्वात जास्त महत्त्वाची मानली जाते. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीची महत्वाची बाब म्हणजे ईडीचे माजी सहसंचालक राजेश्वर सिंह हे भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीत उतरले आहेत. यावरून संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे.

ईडीचे सहसंचालक असलेले राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. आणि नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राजेश्वर सिंह आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर सरोजिनी नगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. स्वेच्छा निवृत्तीनंतर त्यांना भाजपामध्ये २४ तासांच्या आत भाजपाकडून उमेदवारी घोषित झाल्याची माहिती समोर येत आहे. पण आजवर त्यांची जी कारकीर्द राहिली आहे त्यामुळे त्यांचे अनेक राजकीय प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत. ज्या प्रकरणांमध्ये किंवा तपासात ते सक्रिय होते त्यामुळे त्यांच्या हितशत्रूंची यादी खूपच मोठी आहे.

राजेश्वर सिंह हे १९९६ च्या बॅचचे पीपीएस अधिकारी आहेत. जेव्हा लखनऊचे डेप्युटी एसपी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती तेव्हा सर्वजण त्यांना ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखत होते. त्यांच्या नावावर एकूण तेरा एन्काउंटर आहेत.
ईडीचे माजी सहसंचालक राजेश्वर सिंह यांनी २-जी प्रकरण आणि चिदंबरम प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणुन महत्त्वाची भुमिका बजावली होती.

हे ही वाचा:

‘काचा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांचा अपघात

‘दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी ठाकरे सरकारकडे वेळ आहे’

कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्ट

क्रीडा जगतातून रशिया, पुतीनची कोंडी

कॉमनवेल्थ गेम्स, टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा आणि सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांसारख्या प्रकरणांच्या तपासातही राजेश्वर सिंह यांचा सहभाग आहे. याशिवाय त्यांच्या विभागातील लोक त्यांना सायबर जेम्स बाँड म्हणूनही ओळखायचे.

Exit mobile version