26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामाबेहिशोबी मालमत्ता जमवणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटकेत

बेहिशोबी मालमत्ता जमवणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटकेत

पंजाबच्या दक्षता ब्युरोची कारवाई

Google News Follow

Related

पंजाबच्या दक्षता ब्युरोने (Punjab Vigilance Team) रविवार, ९ जुलै रोजी माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटक केली. २०१६ ते २०२२ या कालावधीत बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. पंजाबमधील भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्देशानंतर कारवाई करण्यात आली असून ओमप्रकाश सोनी यांना सोमवार, १० जुलै रोजी अमृतसर न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

ओमप्रकाश सोनी तत्कालीन चन्नी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. दक्षता पथकाने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत माजी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न ४ कोटी ५२ लाख १८ हजार ७७१ रुपये होतं, तर खर्च १२ कोटी ४८ लाख ४२ हजार ६९२ रुपये होता. तर, ओ पी सोनी यांनी त्यांच्या पत्नी सुमन सोनी आणि मुलगा राघव यांच्या नावे मालमत्ता जमा केली होती. माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून भ्रष्टाचार विरोधात मोहीम सुरू असून चंदीगडमध्ये बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत ओमप्रकाश सोनी यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करून बेहिशोबी मालमत्ता मिळवल्याचं म्हटलं होतं. ओमप्रकाश सोनी हे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. चन्नी सरकारमध्ये असताना त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, स्वातंत्र्य सैनिक आणि अन्न प्रक्रिया या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती.

हे ही वाचा:

दिल्ली बुडाली; दिल्लीकरांची केजरीवालांवर टीका

गोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला, केली रुग्णाला मदत

सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाही ते आता विदर्भात आलेत!

ओमप्रकाश सोनी यांच्याविरुद्ध अमृतसर रेंज पोलीस स्टेशन दक्षता ब्युरोमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ब) आणि १३ (२) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा