माजी क्रिकेटपटू अशोक डिंडावर हल्ला

माजी क्रिकेटपटू अशोक डिंडावर हल्ला

Source:ANI

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी सुरु आहे. अशावेळी हिंसाचाराच्या मोठ्या घटना सातत्याने घडत आहेत. यात राजकीय नेते आणि उमेदवारांवरील हल्ल्यांचाही समावेश आहे. कालच भाजपाच्या एका कार्यकर्त्याच्या ८५ वर्षीय आईचा अशाच हल्ल्यामुळे मृत्यू झाला. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि नुकताच भाजपामध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवलेला अशोक दिंडा याच्यावर हल्ला झाला आहे. अशोक दिंडाचा रोड शो सुरु होता, त्यावेळी हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे.

अशोक दिंडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोयना विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी या परिसरात प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे. दिंडा यांनी स्वत: ट्वीट करुन या हल्ल्याची माहिती दिली आहे. तसंच हा हल्ला तृणमूल काँग्रेनं घडवून आणल्याचा आरोपही दिंडा यांनी केलाय.

“तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या ताफ्यावर हल्ला केला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मोयनामधील बीडीओजवळ मला घेरलं आणि हल्ला केला. हा हल्ला दुपारी 4 वाजता केला गेला.” असं ट्वीट दिंडा यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

इंदुरीकर महाराज यांच्या विरोधातील खटला रद्द

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी

संजय राऊत यांची चौकाशी करा

११ लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम- अतुल भातखळकर

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचलाय. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रचारात जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १ एप्रिलला होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यात मतदान होणार आहे. तर २ मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

Exit mobile version