उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ४० हुन जास्त शिवसेनेचे माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे यांना एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. पहिले आमदार आणि आता माजी नगरसेवकांनीदेखील शिवसेनेला रामराम केला आहे. काल ठाण्यातील ६७ पैकी ६६ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन पाठिंबा असल्याचे सांगितले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. त्यापाठोपाठ संध्याकाळी नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर लगेच मध्यरात्री कल्याण डोबिंवलीमधील ५० माजी नगरसेवकदेखील शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.
हे ही वाचा:
संजय पांडेंवर तीन गुन्हे दाखल, सीबीआयची छापेमारी
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘चिन्ह’ जाणार?
पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाराणसीमध्ये १ हजार ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
मुंबई, ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असून कल्याण डोंबिवलीतील सुमारे ५० माजी नगरसेवकांनी देखील शिंदे यांना समर्थन दिले आहे. या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा उपस्थित होते. तसेच डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. आता स्थानिक पातळीवरही मोठे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, पुण्यातील शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याच म्हटल जात आहे. याशिवाय २०१७ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले पुण्यातील ५ नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.