काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याचा भाजपामध्ये प्रवेश

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याचा भाजपामध्ये प्रवेश

मागील काही दिवसांपासून काँग्रेसला सातत्याने धक्के बसत आहेत. यात आता अजून एक भर पडली आहे. जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते पक्षावर नाराज आहेत. त्यातच रविवारी आझाद यांच्या पुतण्याने काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत आपल्या काकांशी म्हणजेच गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा केली नाही असे मुबश्शीर आझाद यांनी स्पष्ट केले आहे. मुबश्शिर आझाद आणि त्यांच्या समर्थकांचे भाजप जम्मू काश्मीर युनिटचे अध्यक्ष रविंदर रैना आणि माजी आमदार दलीप सिंह यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

याबाबत मुबश्शीर आझाद म्हणाले, ” काँग्रेस पक्ष भांडणामध्ये गुंतला आहे. तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लोकांच्या कल्याणाची कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे मलाही जनतेच्या कल्याणासाठी काम करायचे आहे. ” एप्रिल 2009 मध्ये गुलाम नबी आझाद यांचे भाऊ गुलाम अली यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला होता.

हे ही वाचा:

रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान उद्ध्वस्त

युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री

रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान उद्ध्वस्त

श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयासह भारताने रचले हे नवे विक्रम

मागील काही दिवसांपासून आझाद हे काँग्रेस पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा चालू होती. त्यातच पुतण्याने पक्ष सोडल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या मुद्यावरून आझाद यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा मोठा गट नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंर जयराम रमेश यांनी आझादांवर उघडपणे टीका केली होती.

Exit mobile version