25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाकाँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांना 'या' प्रकरणात एक वर्षाची शिक्षा!

काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांना ‘या’ प्रकरणात एक वर्षाची शिक्षा!

Google News Follow

Related

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना दहा वर्षांपूर्वीच्या हिंसाचार प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे प्रकरण २०११ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह सहा जणांना इंदूर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना एक वर्षाच्या शिक्षेसह पाच हजार दंडही ठोठावण्यात आला. मात्र हे प्रकरण खोट असल्याचे सांगत दिग्विजय यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

विशेष न्यायाधीश मुकेश नाथ यांनी दिग्विजय आणि उज्जैनचे माजी लोकसभा खासदार प्रेमचंद गुड्डू यांना भारतीय आयपीसीच्या कलम ३२५ आणि कलम १०९ अंतर्गत दोषी ठरवले. तसेच अनंत नारायण, जयसिंग दरबार, अस्लम लाला आणि दिलीप चौधरी या इतर चार जणांना कलम ३२५ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. मात्र दिग्विजय सिंह यांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण दहा वर्षे जुने असून त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. राजकीय दबावाखाली माझे नाव जोडण्यात आले आहे. आता आम्ही या प्रकरणी अपील करणार आहोत’, असे त्यांनी म्हटले. सध्या त्यांना जामीन मिळाला असून दिग्विजय उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला ‘नो’ एन्ट्री

बीरभूम हिंसाचाराच्या तपासादरम्यान सापडले क्रूड बॉम्ब

काय आहे प्रकरण?

११ वर्षे जुन्या अत्याचार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे, हे प्रकरण १७ जुलै २०११ रोजीचे उज्जैनचे आहे. त्यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून दिग्विजय सिंह आणि प्रेमचंद गुड्डू यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये वादावादी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. उज्जैन येथील माधव नगर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भाजपा नेत्यांच्या तक्रारीवरून दिग्विजय सिंह, प्रेमचंद गुड्डू, तत्कालीन आमदार महेश परमार आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा