माजी सरन्यायाधीश आर सी लाहोटी यांचे निधन

माजी सरन्यायाधीश आर सी लाहोटी यांचे निधन

भारताचे माजी सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचे २३ मार्च रोजी संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात निधन झाले. न्यायमूर्ती लाहोटी हे ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानसह अनेक नेत्यांनी यांनी शोक व्यक्त केला आहे.

लाहोटी यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४० रोजी मध्य प्रदेश मध्ये झाला होता. एप्रिल १९७७ मध्ये त्यांची बारमधून थेट राज्य उच्च न्यायिक सेवेत भरती करून जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती लाहोटी यांची १ जून २००४ रोजी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायमूर्ती लाहोटी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. वंचितांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात लाहोटींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील त्यांचे योगदान आणि वंचितांना जलद न्याय मिळवून दिल्याबद्दल लाहोटी नेहमी स्मरणात राहतील. असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.

न्यायमूर्ती लाहोटी यांच्या निधनाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही शोक व्यक्त केला आहे. शोकसंदेशात चौहान म्हणाले की, लाहोटी यांच्या निधनाने देशाची आणि राज्याची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

हे ही वाचा:

विधानसभेत एकमताने ‘शक्ती कायदा’ मंजूर

शेअर बाजार उघडताच आज गडगडला

जात धर्म अन गोत्र सोडुनी बनली जनाब सेना

आज लोकसभेत काही मोठे होणार?

तसेच मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले की, लाहोटी यांनी न्यायव्यवस्थेत उच्च आदर्श ठेवला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version