आमदार सत्यजित तांबे पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत राहिली आहे. सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात पुन्हा काँग्रेसमध्ये या असे आमंत्रण दिले आहे. मात्र मामाच्या या आमंत्रण रुपी सादेला त्यांच्या भाच्याने कवितेचे ट्विट करत प्रतिसाद दिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक घटना घडल्या . यामुळे काँग्रेसचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यानंतर काँग्रेस पक्षातून सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी पक्षातून निलंबित करण्यात आले. तर सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पण आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसमधील वाद सर्वांसमोर आला आहे.
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…
नजरेत सदा नवी दिशा असावी ।घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 14, 2023
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपचारानंतर परत आल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहोत, त्यावेळी सत्यजित तांबे सुद्धा उपस्थित होते त्यावेळेस थोरात म्हणाले की, तुझ्याशिवाय काँग्रेसला आणि काँग्रेस टीमला कसे करमणार? असा प्रश्न सुद्धा विचारला. त्यावर आज सत्यजित तांबे यांनी ट्विटने उत्तर दिले आहे
काय आहे ट्विट
उडत्या पाखरांना पार्टीची तमा नसावी , नजरेत सदा दिशा असावी …. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही , क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.
अशा सूचक ओळी त्यांनी ट्विट केल्या आहेत. यावरून काँग्रेसमध्ये परतणार की नाही हेच सांगता येत नाही.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
बाळासाहेब थोरात काय म्हणाले
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आली तेव्हा सत्यजितने खूप काम केले होते. सत्यजितची टीम काँग्रेसमध्ये राहिली त्यामुळे तुला आणि त्यांना पण करमणार नाही , माझा हात नीट असता तर तांत्रिक चूक टाळता आली असती मी स्वतः नाशिक मध्ये राहिलो असतो तर अशी चूक होऊ दिली नसती पण यामध्ये माझ्या मताची दिल्लीकडून दखल घेतली गेली असून पक्षांतर्गत वाद आम्ही पक्षातच सोडवू, असे जाहीर वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.