राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेसाठी भाजपाची जाहीरनामा समिती स्थापन

निर्मला सीतारामन समन्वयकाच्या तर पियुष गोयल सह समन्वयकाच्या भूमिकेत

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेसाठी भाजपाची जाहीरनामा समिती स्थापन

सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. एकीकडे अनेक पक्ष आपले उमेदवार जाहीर करत असून भाजपाकडूनही अनेक राज्यांमधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची जाहीरनामा समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीमध्ये २७ सदस्य असून सर्व दिग्गज नेत्यांचा यात समावेश आहे. भाजपाकडून यंदा लोकसभेसाठी ‘अब की बार ४०० पार’ असा नारा देण्यात आला आहे. यासाठी जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनामा समितीमध्ये दिग्गजा नेत्यांचा समावेश आहे. राजनाथ सिंह यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. तर, निर्मला सीतारामन या समन्वयक असणार आहेत. समितीमध्ये २७ सदस्य असणार आहेत. आधी उमेदवारांची नावे जाहीर झाली आणि आता पक्षाने जाहीरनामा समिती जाहीर केली आहे. पियुष गोयल यांच्याकडे सह समन्वयक या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक जाहीरनामा समितीची घोषणा केली आहे. या समितीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची नावे आहेत. अरुणाचल प्रदेशमधून किरेन रिजीजू, ओडीसामधून अश्विनी वैष्णव, मध्य प्रदेशातून शिवराज सिंग चौहान, उत्तर प्रदेशमधून स्मृती इराणी, महाराष्ट्रातून विनोद तावडे अशा अनेक दिग्गज नेत्यांची नावे या समितीत आहेत.

हे ही वाचा:

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद मिटला

व्याभिचारी महिलेला सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचून मारणार

भारतीय नौदलाचा पुन्हा चाच्यांशी संघर्ष; अपहृत जहाजावरील २३ पाक कर्मचाऱ्यांची सुटका

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

१९ एप्रिलपासून निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. सुमारे ९७ कोटी पात्र भारतीय मतदार सहा आठवडे आणि सात टप्प्यांत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत पुढील सरकार कोणाचे असणार हे ठरवणार आहेत. २०१४ मध्ये ‘अबकी बार मोदी सरकार’ आणि २०१९ मध्ये ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणांनंतर, आगामी लोकसभा निवडणुकीतील भाजपाचा प्रचार मंत्र ‘अबकी बार ४०० पार’ आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएन यंदा ४०० आकडा पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Exit mobile version