30 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामादीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी दुसरी चौकशी समिती तयार करा

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी दुसरी चौकशी समिती तयार करा

Google News Follow

Related

खासदार नवनीत राणा यांनी आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी वनखात्यानं गठित केलेल्या चौकशी समितीऐवजी दुसरी चौकशी समिती तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.

सध्या जी चौकशी समिती नेमलेली आहे, त्या समिती मधील सदस्य हे श्रीनिवास रेड्डी यांच्या हाताखाली तर कोणी त्यांच्यासोबत काम केलेले आहेत. त्यामुळे ही चौकशी समिती दिपाली चव्हाणला न्याय देऊ शकत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी आता खासदार नवनीत राणा ह्या केंद्रीय वनमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्र लिहून बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दुसरी समिती नेमण्याची मागणी करणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे सुसाईड नोट लिहिण्यात आली होती. संबंधित सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी डीएफओ विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

हे ही वाचा:

प्रमोद भगतने मिळवले पॅरालिम्पिकमधील चौथे सुवर्ण पदक

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं?

भारताने गाठला परकीय चलन साठ्याचा उच्चांक

चित्रा वाघ यांनी देखील दीपाली चव्हाण आत्महत्ये प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर  ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले होते. लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे हरामखोर डीसीएफ शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला, तिला अपमानित केल जात होतं, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा