पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा

पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून पेगॅसस प्रकरणावर भाष्य करणारा रोखठोक अग्रलेख लिहिला आहे. एकंदरित केंद्र सरकारवर भडकलेल्या राऊतांना चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची चिंता करण्यापेक्षा पेग्विंनची चिंता करा म्हणत प्रत्युत्तर दिलंय.

आज ज्या युवराजांच्या ‘प्रिय’ ठेकेदारामुळं ‘डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रूग्णासाठी ‘प्राणवायु’ पुरवठ्याचा ठेका दिला आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाई व गचाळ कारभारासाठी फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला, का आणि कोणासाठी? असा सवाल करत संजयजी पेगासिसची चिंता सोडा, ‘पेंग्वीनची’ चिंता करा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

पेगॅसस’ प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय वाटतं. ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर करण्यात आलीय.

हे ही वाचा:

‘ही’ अट मान्य केली, तर टेस्लाच्या गाड्या स्वस्त होणार

सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं शंभरीत पदार्पण

भारताला हरवत श्रीलंकेने साधली टी-२० मालिकेत बरोबर

पेगॅसस’ प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय वाटतं. ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर करण्यात आलीय.

Exit mobile version