ठाकरेंची सही, भातखळकरांचा शेरा 

ठाकरेंची सही, भातखळकरांचा शेरा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खोटी सही करून निर्णयात फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून काम करतात म्हणूनच मंत्रालयात असे अनुचित प्रकार घडत असल्याचा टोला भातखळकरांनी लगावला आहे. हे एक प्रकरण उघडकीस आहे अशी अजूनही काही प्रकरणे असू शकतात असा संशय व्यक्त करताना या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करा अशी मागणीही आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खोटी सही करून निर्णयात बदल कारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या संबंधी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. पण थेट मुख्यमंत्रीचीच बनावट सही करून या निर्णयात फेरफार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे. 

Exit mobile version