एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात

एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात तपास चालू असताना, मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. त्यानंतर मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नेमणुक झाली. आज प्रथमच एनआयएची एक टीम पोलिस आयुक्तालयात दाखल झाली होती.

या प्रकरणाचा तपास एनआयएने करायला सुरूवात केली होती. याबाबत सचिन वाझे याला देखील ताब्यात घेण्यात आले होते. मात्र प्रथमच एनआयएची टीम पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झाली होती. मात्र या भेटीतून नेमके काय निष्पन्न झाले ते कळू शकलेले नाही.

हे ही वाचा:

एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?

ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातील गृहमंत्री बदलणार?

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

एनआयएने या प्रकरणात गुंतलेल्या पाच गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यात अंबानींच्या घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी, एक पांढरी इनोव्हा, दोन मर्सिडिज आणि एक प्रॅडो गाडीचा समावेश आहे. एनआयए कार्यालयात पुण्याहून फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली आहे. या सर्व गाड्यांची त्यांच्याकडून तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी एनआयएला स्कॉर्पिओ गाडीतून काही चीजवस्तू ताब्यात घेतल्या. यात ₹५ लाख रोख, काही कपडे आणि नोटा मोजणाऱ्या यंत्राचा समावेश होता.

यापूर्वी सचिन वाझेच्या चौकशीत त्याने एक सदरा मुलुंड टोलनाक्याजवळ जाळला होता. एक सदरा त्यांच्या घरातून आणि एक सदरा मुलुंड टोलनाक्याजवळून हस्तगत करण्यात आला आहे. एनआयए बरोबरच एटीएसनेदेखील सचिन वाझे याच्या ताब्याची मागणी केली होती. सचिन वाझे याचे प्रॉडक्शन वॉरंट एटीएसला मिळाले आहे. त्यामुळे एनआयएची कोठडी संपल्यानंतर वाझे याचा ताबा एटीएसकडे दिला जाऊ शकतो.

Exit mobile version