आसाम चर्चला धर्मांतरासाठी परदेशी निधी!

आसाम चर्चला धर्मांतरासाठी परदेशी निधी!

आसाम मधील बॅप्टिस्ट चर्च परदेशी निधीचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले आहे. गोलाघाट मधील चर्चला परदेशातून ₹३.२४ कोटी इतका निधी सामाजिक कार्यासाठी आला होता. पण या निधीचा वापर धर्मांतरासाठी केल्याचे समोर येत आहे. लीगल राईट्स ऑब्सर्वेटरी या सामाजिक संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला आहे.

या चर्चला ‘ख्रिश्चन फॉर सिटी इंटरनॅशनल’ संस्थेकडून निधी आला आहे. या संस्थेने २९ जुलै २०१८ च्या फेसबुक पोस्ट मध्ये भारतातील मुलांचे धर्मांतर करण्याची योजना जाहीरपणे मांडली होती. ‘शायनिंग स्टार्स चाईल्ड स्पॉन्सरशिप’ या कार्यक्रमा अंतर्गत हा धर्मांतराचा कट करण्यात आला होता. २०१९ साली बॅप्टिस्ट चर्चला अमेरिकेतील ‘बोर्ड ऑफ इंटरनॅशनल मिनिस्टरीज’ यांच्याकडून धर्मांतरासाठी निधी आला होता, तर २०१७ साली भारत सरकारने बंदी घातलेल्या ‘कंपॅशन ईस्ट इंडिया’ या संस्थेनेही धर्मांतरासाठी चर्चला रसद पुरवली आहे.

या चर्चची नोंदणी रद्द करावी अशी मागणी लीगल राईट्स ऑब्सर्वेटरी’ ने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे.

Exit mobile version