“पुढची पाच वर्षे नरेंद्र मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाणार”

एनडीए आघाडीला नितीश कुमार यांनी दिला विश्वास

“पुढची पाच वर्षे नरेंद्र मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाणार”

“पुढची पाच वर्ष आम्ही पंतप्रधान मोदींना साथ देऊ,” असं आश्वासन बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयुचे नेते नितीश कुमार यांनी दिले आहे. शुक्रवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएचा घटकपक्ष असलेल्या जेडीयूचे नेते नितीश कुमार हे युतीसाठी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. नितीश कुमार एनडीएची साथ सोडत परत इंडिया आघाडीबरोबर जातील, अशी चर्चाही रंगली होती. मात्र, नितीश कुमार यांनी स्पष्ट मांडलेल्या भूमिकेमुळे आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

“आम्ही नरेंद्र मोदींना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. ते गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान आहेत. तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. मोदींनी गेल्या १० वर्षात देशातील जनतेची सेवा केली आहे. पुढे पाच वर्षही ते देशातील जनतेची सेवा करतील, असा विश्वास आहे. त्यामुळे पुढची पाच वर्षे मोदींबरोबर राहून त्यांना साथ देऊ आणि मोदी सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ,” असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे.

“जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील. त्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही. परंतु, नरेंद्र मोदी यांनी देशाची खूप सेवा केली आहे. विरोधकांना संधी मिळाली आहे परंतु इथून पुढे त्यांनी कुठलीच संधी मिळणार नाही. आता मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाणार आहे,” अशी टीका नितीश कुमार यांनी विरोधकांवर केली आहे.

हे ही वाचा:

संसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची एकमताने निवड

पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?

टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!

सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत

“खरं तर आजच शपथविधी व्हायला पाहिजे होता. लवकरात लवकर सगळं व्हावं. जे लोक इकडे-तिकडे करतात त्यांना काहीच लाभ होत नाही. आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूर्णपणो आहोत,” अशी मिश्कील टिपण्णीही नितीश कुमार यांनी केली आहे.

Exit mobile version