जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वक्तव्यावरुन भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “नातवाच्या प्रेमापोटी त्यांनी हे वक्तव्य केलंय. ज्या वक्तव्याने अहिल्यादेवींचा अपमान झालाय. पवारांची ही गंभीर चूक आहे”, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
“अहमदनगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून जिथून राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार म्हणून विधानसभेवर जातात त्या मतदारसंघातल्या चौंडीला अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला.” असे शरद पवार म्हणाले होते. “अहिल्याबाईंच्या जन्माचे ठिकाण सांगण्याकरिता त्यांनी रोहित पवारांचे आणि त्यांच्या मतदारसंघाचे नाव घेण्याची खरंच गरज होती का?” असा सवाल विचारत त्यांच्या याच वक्तव्यावर धनगर समाजातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवारांनी जे नातवाच्या प्रेमापोटी वक्तव्य केलं त्या वक्तव्याने अहिल्यादेवींचा अपमान झाला आहे. त्यांच्या बोलण्यातून अहिल्यादेवींपेक्षा नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आणि त्यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवीचा जन्म झाला आहे. असे सुचवणारे पवारांचे वक्तव्य होते. जे अतिशय गंभीर आहे. पवारांची ही गंभीर चूक आहे.” असेही राम शिंदे म्हणाले.