नरेंद्र मोदी यांची ‘शेजारधर्म प्रथम’ची हाक

शपथविधी सोहळ्याला शेजारील राष्ट्रांचे प्रमुखांना आमंत्रण

नरेंद्र मोदी यांची ‘शेजारधर्म प्रथम’ची हाक

नरेंद्र मोदी रविवारी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांनी ‘शेजारधर्म प्रथम’ अशी हाक दिल्यामुळे या शपथविधी सोहळ्याला शेजारील राष्ट्रांचे प्रमुख तसेच, वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यात आवर्जून नाव घ्यावे लागेल ते मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचे. चीनधार्जिण्या मुइझ्झू यांच्या भूमिकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि मालदीवचे संबंध ताणले आहेत. मात्र ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच, शपथविधी सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदी या नेत्यांशी संवाद साधतील, असे बोलले जात आहे.

मुइझ्झू हे त्यांच्या काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यासह शनिवारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीला रवाना होतील. तसेच, बांग्लादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशल्स या देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. यापैकी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान कमलदहल प्रचंड यांनी ते उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे.

हे ही वाचा:

मीरारोडमधून ९ बांगलादेशी महिलांना अटक

१८व्या लोकसभेचे पहिले सत्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यात

शेअर्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचे शेअर्स वधारले

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर

दहल आणि रानिल विक्रमसिंघे ९ जून रोजी दिल्लीला येतील. तर, पंतप्रधान हसिना शनिवारी दिल्लीसाठी रवाना होतील. दहल यांनी शपथविधी सोहळ्याला येणार असल्याचे कळवल्यानंतर दहल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरून संभाषण झाले. पंतप्रधान शेख हसिना शनिवारी सकाळी ११ वाजता ढाका येथून प्रयाण करतील. ‘ पंतप्रधान शेख हसिना शनिवारी, ८ जून रोजी सकाळी ११ वाजता ढाका येथून दिल्लीला प्रयाण करतील. त्यानंतर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर १० जून रोजी दुपारी त्या मायदेशी परततील,’ असे बांगलादेशच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांत मालदीव आणि भारतामध्ये तणावाचे संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर मुइझ्झू यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे, महत्त्वाचे मानले जात आहे.

Exit mobile version