विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शिंदे सरकारने जिंकल्यानंतर आज, ४ जुलै रोजी शिंदे सरकारची बहुमताची परीक्षा आहे. आज सकाळी ११ वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार असून आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपा यांच्या सरकारला आज बहुमत सिद्ध करायचे आहे. आज सकाळी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. आज होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्याकडून आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं असून यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे. मतदानाच्या वेळी काय रणनीती असेल यावर चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/qz4xSxqWgz
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 3, 2022
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता
माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स
शिवसेनेकडून आढळराव पाटलांची हकालपट्टी नंतर माघार
सामाजिक संदेश देणारा ‘व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२’ शो
दरम्यान, उद्धव ठाकरेंना दोन मोठे धक्के बसले आहेत. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी भरत गोगावले यांना मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या आणि काही अपक्ष आमदारांना घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रविवार, ३ जुलै रोजी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली असून आता आज होणाऱ्या बहुमत चाचणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.