…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत

…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत

आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केली भीती

“मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही. भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले. गेली पंचवीस वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतणाऱ्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना?” असा सवाल भाजपा नेते आणि आमदार ऍड. आशीष शेलार यांनी केला आहे.

“मुख्यमंत्र्यांनी तातडीने महापालिकेसह लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी. या विषयातील तज्ज्ञांना बोलवावे व त्वरीत आवश्यक असतील ते निर्णय घ्यावेत. मुंबईत यावेळी दिसणारे हे बदल धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ?” असे आवाहनही आशीष शेलार यांनी केले.

 

 

फ्लड वॉर्निंग सिस्टीम कलानगरसाठीच!

मिठी नदीवर फ्लड गेट लावण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. फ्लड वॉर्निंग सिस्टिम केवळ कलानगरसाठीच आहे. कलानगरला फ्लड वॉर्निंग आणि बाहेर फ्लड बेरिंग. अशी टीका आमदार शेलार यांनी केली आहे. वरळीतील फ्लड गेट काढण्यात आलेले असताना मिठी नदीवर फ्लड गेट कशासाठी?, इतर ठिकाणी लावलेल्या फ्लड गेटचा काय फायदा झाला? असे सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणीही आशीष शेलार यांनी केली आहे.

आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत पालिकेवर फ्लड गेट घोटाळ्याचा आरोप करत ही मागणी केली. मिठी नदीवर फ्लड गेट लावण्यात येणार आहे. १८५ ठिकाणी हे फ्लड गेट लावणार आहेत. मिठी नदीला फ्लड गेट लावणार आहात तर वरळीचे फ्लड गेट का काढले? इतर ठिकाणी लावलेल्या फ्लड गेटचा काय फायदा झाला? हा पालिकेचा नवा फ्लड गेट फ्रॉड आहे. मुख्यमंत्री संवेदनशीलपणे काम करत असतील. पण पालिकेत काय चाललं आहे? मुख्यमंत्र्यांनी एसआयटी मार्फत या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

यावेळी त्यांनी पालिकेच्या फ्लड वॉर्निंग सिस्टिमवरही टीका केली. फ्लड वॉर्निंग सिस्टिम केवळ कलानगरसाठीच आहे. कलानगरला फ्लड वॉर्निंग आणि बाहेर फ्लड बेरिंग. कलानगरात खूप पंप लावले आहेत. शिवसेनेचे हेच धंदे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

अमरिंदर विरुद्ध सिद्धू वाद चिघळणार?

शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’

येत्या २४-३६ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

उघड्या गटारात पडून ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता

नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार का?

एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?; असा संतप्त सवाल ही आमदार अँड आशिष शेलार यांनी केला केला आहे.

राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने ११२ टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही ३१ लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असं ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात आणून ठेवायचं आहे. सेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली.

Exit mobile version