चक्का जाम आंदोलनात भिंद्रानवाले दिसला?

चक्का जाम आंदोलनात भिंद्रानवाले दिसला?

हिंसक वळण घेऊन वाट भरकटलेल्या शेतकरी आंदोलनात आता भिंद्रानवालेचा चेहरा दिसल्याचे म्हटले जात आहे. २६ जानेवारीच्या हिंसेनंतरही आंदोलक नेत्यांनी आपला हटवादीपणा सोडला नसुन ६ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनातच भिंद्रानवाले दिसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

६ फेब्रुवारीच्या चक्काजामला म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नसला तरी आता भिंद्रानवालेचे नाव चर्चेत आल्यामुळे आधीच विविध कारणांनी बदनाम झालेले आंदोलनाभोवतीचे संशयाचे धुके अधिकच वाढले आहे. लुधियानात सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनात हा प्रकार घडला. या आंदोलनात सहभागी झालेल्या एका ट्रॅक्टरवर एक झेंडा लावलेला होता. या झेंड्यावर एका व्यक्तीचे चित्र आढळून आले. या व्यक्तीचा चेहरा बऱ्याच अंशी भिंद्रानवालेच्या चेहऱ्याशी मिळता जुळता होता. त्यामुळेच आता तो फोटो नक्की भिंद्रनवालेचा होता की आणखी कोणाचा या विषयीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने या संबंधीचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रसारित केला आहे.

भिंद्रानवाले हा खलिस्तानची मागणी करणारा फुटीरतावादी नेता होता. हत्यारांच्या जोरावर त्याने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर कब्जा केला होता. भारतीय सैन्याने ऑपरेशन ब्ल्यू स्टार अंतर्गत त्याचा खात्मा केला आणि सुवर्ण मंदिराची मुक्तता केली.

Exit mobile version