गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

उल्हासनगर येथील न्यायालयाचा निर्णय

गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली होती. यानंतर गणपत गायकवाड यांना अटका करण्यात आली होती. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार गणपत गायकवाड यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गायकवाड यांच्यासह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि आणखी एका सहकाऱ्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. गोळीबारानंतर गणपत गायकवाड आणि इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ते बुधवार, १४ फेब्रुवारी रोजीपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यानंतर बुधवारी त्यांना सकाळी उल्हासनगर येथील न्यायलयासमोर हजर करण्यात आले. गणपत गायकवाड यांना उल्हासनगर चोपडा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने गायकवाड आणि इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या बाजूचे आणि आरोपींच्या वकिलांचे युक्तिवाद झाल्यावर दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी गायकवाड आणि इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. साधारण न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होते. मात्र, गायकवाड यांच्या या सुनावणीसाठी सकाळी ९ वाजता न्यायालयाचे कामकाज सुरू करण्यात आले. सुरक्षेच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:

तमिळ दिग्दर्शकाच्या घरातून चोरीला गेलेले राष्ट्रीय पुरस्कार चोरटयांनी केले परत!

शेतकरी आंदोलनात दिसला खलिस्तानी ध्वज! 

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करू!

या सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाच्या परिसरातील वाहतुकीत बदल करत २०० मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जमावबंदीचे आदेशही देण्यात आले होते.

Exit mobile version