कोस्टल रोडच्या पिलर्सचे अंतर वाढवा; मच्छिमारांचे आंदोलन, काम बंद पाडले

कोस्टल रोडच्या पिलर्सचे अंतर वाढवा; मच्छिमारांचे आंदोलन, काम बंद पाडले

वरळीमध्ये सुरु असलेल्या कोस्टल रोडच्या खांबांच्या अंतराबाबत मच्छिमारांचे आंदोलन सुरूच आहे. मच्छिमारांनी कोस्टल रोडच्या खांबांच्या अंतराबाबत महापालिकेला आपला अहवाल देऊन २० दिवस उलटले तरीही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाकडून दुर्लक्षित झाल्याने मच्छिमारांनी निषेध व्यक्त केला आहे. म्हणून काल मच्छिमारांनी वरळी येथील कोस्टल रोडचे काम बंद पाडले.

कोस्टल रोडसाठी समुद्रामध्ये पिलर्सची बांधणी केली जात आहे. या दोन पिलरमधील अंतर २०० मीटर ठेवण्याची मागणी मच्छिमार करत आहेत. तर पालिकेने हे यानंतर फक्त ६० मीटर ठेवले आहे. प्रशासनाकडून दुर्लक्षित झाल्यामुळे यापूर्वी मच्छिमारांनी दीड महिने कोस्टल रोडचे काम बंद ठेवले होते. गेल्या दोन वर्षांपासून मच्छिमारांशी याबाबत वाद सुरु आहे. ६० मीटर अंतरामधून बोटींची ये जा करणे शक्य नसल्याचे मच्छिमारांचे मत आहे. तसेच इतके कमी अंतर भविष्यात धोकादायक ठरण्याची भीतीही मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.

” याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीनुसार पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मच्छिमारांना पिलरच्या अंतराचा अहवाल सादर करण्यास सांगितला होता. त्यानुसार या अहवालात पिलरमधील कमीत कमी अंतर १६० असावे अशी शिफारस करण्यात आली होती. मार्चला हा अहवाल दिल्यानंतर अद्याप त्यावर पालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पालिका या अहवालाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रश्नाचे कोस्टल रोडचे काम बंद पाडण्यात आले आहे,” अशी माहिती नितेश पाटील यांनी दिली.

हे ही वाचा:

बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम

‘गली बॉय’ फेम रॅपर ​​धर्मेश परमारचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक

गोवंशाची कत्तल करणाऱ्या टोळीचा गोरक्षकांनी केला पर्दाफाश

फक्त ६० मीटर अंतरात मच्छिमारांना आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करावी लागणार आहे. भविष्यात यामुळे जीवितहानी झाली सरकार त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल मच्छिमार संघटनांनी पालिकेला केला आहे.

Exit mobile version