श्रीनगरच्या लालचौकातील घंटाघरावर प्रथमच फडकला भारतीय तिरंगा

श्रीनगरच्या लालचौकातील घंटाघरावर प्रथमच फडकला भारतीय तिरंगा

जम्मू काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनी इतिहास घडला. भारतात आज ७३व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना श्रीनगरच्या लाल चौकातील घंटाघरावर तिरंगा फडकला. ब्रिटिशांच्या काळापासून प्रथमच या घंटाघरावर तिरंगा फडकाविला गेल्याची ऐतिहासिक घटना २६ जानेवारीला घडली. प्रथमच दोन भारतीयांनी येथे ध्वजवंदन केले.

लालचौकातील घंटाघरावर स्थानिक समाजसेवकांनी, कार्यकर्त्यांनी क्रेनच्या माध्यमातून तिरंगा फडकाविला आणि सगळे कॅमेरे त्याकडे रोखले गेले. त्याचे व्हीडिओ बुधवारी भरपूर व्हायरल झाले.

तेथील कार्यकर्ते युसूफ आणि साजिद यांनी तिरंगा या घंटाघरावर फडकाविला आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की, येथे असलेल्या आधीच्या सरकारांमुळे गेल्या ७० वर्षांत तिरंगा कधी फडकलाच नाही.

जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत आम्ही पाकिस्तानी झेंडेच पाहात आलो आहोत. त्याची खंत आम्हाला होती पण इतिहास बदलण्याचे आम्ही ठरविले.

हे ही वाचा:

युवराजच्या घरी आला आणखी एक ‘युवराज’

पद्म पुरस्कार देताना बुद्धदेव भट्टाचार्य यांना विचारले नसावे!

राजपथावर घडले भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचे दर्शन

लवकरच येणार ओला इलेक्ट्रिक कार?

 

साजिद म्हणाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यानंतर कलम ३७० हटविण्यात आले. त्यानंतर बरेच बदर इथे घडले आहेत. घंटाघरावर आज जो तिरंगा फडकाविला गेला आहे, तोच नवा काश्मीर आहे. जम्मू आणि काश्मीरमधील जनतेला हेच हवे होते. आम्हाला इथे पाकिस्तानचे ध्वज नकोत. आम्हाला इथे शांतता हवी आणि विकास हवा आहे.

श्रीनगरमधील लालचौक हा नेहमीच तेथील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अनेक नेत्यांनी या घंटाघरावर भारतीय तिरंगा फडकाविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नव्हते. पण यावेळी इतिहास घडला.

या ध्वजवंदनाच्या निमित्ताने तेथे मार्शल आर्टचे इव्हेन्ट आयोजित करण्यात आले. सुरक्षेचा तगडा बंदोबस्त यानिमित्ताने इथे ठेवण्यात आला होता. तिथे येणाऱ्यांना तपासूनच पुढे पाठविण्यात येत होते.

Exit mobile version