पत्रास कारण की…
नागरिकहो,
भले महाराष्ट्राची काडीचीही माहिती नसली तरी चालेल पण उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा या भाजपशासित राज्यांत खुट्ट झालं रे झालं की, आपल्याला चार ओळी खरडायला मात्र यायला हव्यात. होय. रिकामटेकड्यांना आता हा एक लॉकडाऊनमध्ये चांगला उद्योग मिळाला आहे. पण महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढली आणि तुम्ही त्याबद्दल बोललात की, अजिबात चालणार नाही. तुम्ही लिहायचं ते उत्तर प्रदेशमध्ये कशा चिता जळत आहेत, गुजरातमध्ये कसा कोरोनाचा कहर सुरू आहे, गोव्यात कसे ऑक्सिजनने काही लोक मृत्युमुखी पडले आहेत, गंगेत कसे मृतदेह तरंगताना दिसत आहेत. हे महाराष्ट्राबद्दलच्या प्रेमापोटी केलेले रिकामटेकडे उद्योग अजिबात नाहीत तर हे आहे ती राज्ये भाजपाशासित असल्यामुळे असलेला आत्यंतिक द्वेष.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला
सावरकरांची तथाकथित माफीपत्रे: आक्षेप आणि वास्तव यावर आज व्याख्यान
अतुल्य भारताचा सन्मान करा, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले
मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना
महाराष्ट्रात आज देशातील सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे, लोकांची परवड होते आहे, बेड्स मिळत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. अर्थात, ही अवस्था सगळ्यांच राज्यांत कमीअधिक प्रमाणात आहे. सगळ्याच राज्यातील डॉक्टर्स प्रयत्नांची शर्थ करत आहेत, आरोग्यव्यवस्था २४ तास राबत आहेत. या अवस्थेबद्दल सहानुभूती असायला हवी. ही परिस्थिती सुधारावी यासाठी प्रार्थना करायला हवी. पण ते न करता आपल्या मनातील जी द्वेषाची उबळ आहे ती पहिली बाहेर कशी टाकता येईल, भाजपाशासित राज्यांबद्दल असलेली मळमळ कशी बाहेर निघेल याचा ही मंडळी विचार करत असतात. अत्यंत हीन दर्जाची अशी या मंडळींची वागणूक आहे. ही नतद्रष्ट मंडळी तिकडे उत्तर प्रदेशात काही घडले की, लगेच त्याचे फोटो, बातम्या शेअर करण्यात आघाडीवर आहेत. त्यांना न्यूयॉर्क टाइम्सने भारतातील एखादा चितेचा फोटो छापला की कोण आनंद होतो. मोदींविरोधात एखादा फुटकळ लेख कुणीही लिहिला तरी यांची छाती टरारून फुगते. मुळातच या मंडळींना देशातील परिस्थितीशी काहीएक देणेघेणे नाही. त्यांचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे मोदीविरोध. त्यापायी ते देशाची बदनामीही करायला मागेपुढे पाहणार नाहीत.
नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र सोनिया गांधींना लिहिले. खरे तर, त्याआधी सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहून मोदींनी काय काय करायला हवे वगैरे सल्ला दिला. त्याला उत्तर म्हणून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी हे पत्र लिहिले. तर ते महाराष्ट्रद्रोही ठरले. महाराष्ट्रात काय चालले आहे हे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील एक पक्ष असलेल्या काँग्रेसला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो महाराष्ट्रद्रोह. जणू महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक असणे, मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढणे आणि त्यातून महाराष्ट्र देशात दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर असणे म्हणजे महाराष्ट्रप्रेमच. फडणवीस हे राज्याच्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रात फिरून परिस्थितीची पाहणी करणे, त्यावरून राज्य सरकारला घेरणे अपेक्षितच आहे. गेल्या लॉकडाउनपासून फडणवीस सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात फिरून ही तपासणी करत आहेत. त्यातील त्रुटी राज्य सरकारला दाखवून देत आहेत. ते त्यांनी केले तर ते राजकारण करतात? मग काय करायला हवे? लॉकडाऊन म्हणून कडी लावून घरात बसावे की काय?
हीच ती नतद्रष्ट मंडळी लिहित असतात की, देशातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. जणू काय महाराष्ट्र सोडला तर बाकीचा देश हा वेगळा आहे. या देशाच्या गंभीर स्थितीत महाराष्ट्रातील स्थितीही गंभीर आहेच ना? मग त्याबद्दल विरोधी पक्षनेता या नात्याने फडणवीसांनी बोलले तर तो महाराष्ट्रद्रोह. हा तर बेशरमपणाचा कळसच झाला. अनेक राज्य आहेत जी आपापली कामे करत आहेत. ती दुसऱ्यांवर शिंतोडे उडविण्यापेक्षा आपल्या लोकांना कसे कोरोनातून बाहेर काढता येईल, या प्रयत्नात आहेत. पण दुर्दैवाने महाराष्ट्र, दिल्लीसारख्या राज्यातील सत्ताधारी हे राजकारणात मश्गुल आहेत. याला मीडियाही जबाबदार आहे. सध्या या मीडियाची अवस्था निरोप्याच्या पलीकडे नाही. फडणवीसांनी आरोप केला तो जाऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगायचा. त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया फडणवीसांना येऊन सांगायची आणि त्यांची त्याबद्दलची भूमिका विचारायची. या पलीकडे आपले म्हणून काही कर्तव्य आहे हे हा मीडिया साफ विसरून गेलेला आहे. यावेळी विचार येतो की, समजा आज फडणवीस सत्तेत असते तर…
मविआ
(अर्थात, महेश विचारे आपला)