पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर १८व्या लोकसभेचे पहिले सत्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. या सत्राची सुरुवात शपथविधीने होईल. सर्व खासदारांच्या शपथविधीला दोन दिवस लागू शकतात. त्यानंतर लोकसभाध्यक्षपदाची निवडणूक होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सदनांत संयुक्त बैठकीला संबोधित करून सत्राची औपचारिक सुरुवात करतील.
सत्र सुरू होण्याच्या तारखेवर अंतिम निर्णय केंद्रीय कॅबिनेटद्वारा घेतला जाईल. सत्रादरम्यान पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा दोन्ही सदनांतील सदस्यांशी परिचय करून देतील. हे सत्र २२ जून रोजी समाप्त होण्याची शक्यता आहे. हे सत्र एक आठवड्याच्या छोट्या कालावधीसाठी आयोजित केले जाईल, अशी शक्यता आहे.
हे ही वाचा:
‘एनडीए’च्या बैठकीत हृदयाच्या आकाराच्या पानांनी वेधले लक्ष
पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आजोबांच्या एमपीजी क्लबवर चालविला बुलडोझर
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित
मी चुकलो…निवडणूक अंदाजाबद्दल प्रशांत किशोर यांनी दिली कबुली
यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पावसाळी सत्र सुरू केले जाईल आणि या दरम्यान २०२४-२४मधील नियमित अर्थसंकल्प सादर केला जाईल. रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा झाल्यानंतर लगेचच कॅबिनेटची बैठक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ५ जून रोजी १७वी लोकसभा भंग केली होती. त्यानंतर मुर्मू यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.