गोवा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रीकरांना दिले पर्याय

गोवा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रीकरांना दिले पर्याय

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गोव्यातील निवडणुकांसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर केली. ४० पैकी ३४ उमेदवार भाजपाने जाहीर केले आहेत. त्यात माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी हवी होती, पण त्यांचे नाव त्या यादीत नाही. मात्र त्यांना दोन जागांचे पर्याय देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

ज्या पणजीतून पर्रीकर उमेदवारी लढवत तेथून बाबुश मॉन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेथे उत्पल पर्रीकर यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. पण विद्यमान आमदारालाच आपण उमेदवारी दिल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. उत्पल हे आमच्या परिवारातीलच आहेत त्यांना दोन जागांबद्दल पर्याय दिलेले होते त्यापैकी त्यांनी एक पर्याय नाकारला तर दुसऱ्या पर्यायाबद्दल चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा:

‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’

कुरापती चीनने भारतीय हद्दीतून १७ वर्षीय मुलाचे केले अपहरण

‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर टाळे’

टेनिसपटू सानिया मिर्झाचा टेनिसला गुडबाय!

 

गेले काही दिवस गोव्यात उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी भाजपाकडून दिली जाणार का, यावरून चर्चा सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर अपक्ष उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले होते. तर उत्पल पर्रीकर हेदेखील पणजीतूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगत आहेत.

ही यादी जाहीर करताना त्यात अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

Exit mobile version