27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरराजकारणभाजपाकडून पालघरसाठी मदतीची पहिली खेप रवाना

भाजपाकडून पालघरसाठी मदतीची पहिली खेप रवाना

Google News Follow

Related

मागच्या आठवड्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते वादळाचा फटका बसला होता. ठाकरे सरकारकडून अजून मदतीची ठोस घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजपानेच पुढे येऊन वादळग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार मदतीचा एक ट्रक पालघर जिल्ह्यसाठी आज रवाना झाला.

यावेळेला मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदरा मनीषाताई चौधरी हे यावेळी उपस्थित होते. खासदार गोपाळ शेट्टी, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर देखील यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत मदतीची पहिली खेप घेऊन ट्र पालघरच्या दिशेने रवाना झाला.

हे ही वाचा:

…तरच शेतकरी संघटनांचे म्हणणे केंद्र ऐकणार

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची बीसीसीआयकडून तयारी सुरू

चला कोकणाला देऊ मदतीचा हात; मुंबई भाजपाने दिली हाक

भारतात ऑगस्टपासून दरमहिना तयार होणार ४ कोटी स्पुतनिक डोस

याबाबत अधिक माहिती देताना भाजपा मुंबईने ट्वीट केले आहे की,

पालघर जिल्ह्यातील सफाळे, उसरणी, कोरे आदी ६ गावांत LED बल्ब, ब्लॅंकेट, सिमेंटपत्रे आदी सामान लादलेले ३ ट्रक रवाना होणार आहेत त्यापैकी एक ट्रक आज रवाना झाला. तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या गावकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे.

येत्या दोन-तीन दिवसात कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात मदतीचे ट्रक पाठवणार असल्याचे भाजपाने ट्वीट करून सांगितले आहे. त्याबरोबरच भाजपाकडून मदतीचे आवाहन देखील करण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,

पालघर जिल्ह्यापासून कोकणातील वादळग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतकार्याचा आज शुभारंभ झाला. येत्या दोन-तीन दिवसात कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात मदतीचे ट्रक पोहचणार आहेत. आम्ही कम्बर कसली आहे आपल्या कोकणाला सावरण्यासाठी, तुमची हवी आहे भक्कम साथ. येवा आपल्या कोकणाक मदतीचो हात देवया…

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा