काल मानखुर्द येथील स्क्रॅपयार्डला लागलेली आग, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनतर आता आटोक्यात आली आहे. यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या १९ गाड्यांची गरज यासाठी पडली.
स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मानखुर्द येथल्या भंगार यार्डाला आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील या भागात आग लागण्याची घटना घडली आहे. काही नागरिकांच्या मते याभागात काही ठिकाणी तेल साठवले असल्याने ते आगीसाठी इंधनासारखं काम करते.
मानखुर्द येथे लागलेल्या आगीवरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आक्रमक झाली आहे. भाजपाचे नेता आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेवर हल्ला चढवला आहे. या बाबत त्यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘भंगार माफिया, तेल माफिया आणि कचरा माफिया हे या आगीचे मूळ कारण आहे. अशाच प्रकरची आग १२ फेब्रुवारी २०१८ रोजी देखील लागली होती. बीएमसी माफिया मानखुर्द परिसरातल्या डंपिंग यार्डाच्या जवळील गरीब लोकांच्या जीवाशी खेळत आहे.’
Scrap Mafia, Oil Mafia, Kachra Mafia is the root cause of "Mankhurd Fire". Similar type of Fire took place on 12 February 2018 at Mankhurd. "BMC Mafias" are playing with lives of poor people at/near Mankhurd Dumping Yard @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2021
घटनास्थळाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भेट दिली. याबद्दल त्यांनी ट्वीटरवरून माहिती दिली.
मानखुर्द मंडाळा येथील कुर्ला स्क्रॅप मटेरियलला आग लागल्याची घटना समजताच मुंबईच्या महापौर @KishoriPednekar व उपमहापौर @AdvSuhasWadkar यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या च्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.@mybmc @ pic.twitter.com/zXUpyHxyd2
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) February 5, 2021