शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर दिल्लीत भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली असून राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना भाजप कार्यकर्त्यांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांचा शरद पवार यांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याविषयी बोलताना संतप्त संजय राऊत यांनी सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण आणू नका. ×××गिरी बंद करा असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
वाघाने बंद केले वऱ्हाडाला; घरातच लागले लग्न
‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…
…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?
‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप
संजय राऊत यांच्यावर मुंबईच्या मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी न केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.