राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई अध्यक्षांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी प्राथमिक अहवाल नोंदवला आहे. यामध्ये भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर असभ्य भाषेचा वापर केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप विरोधातील राजकीय वादात अमृता फडणवीस या मुलाखतीद्वारे तसेच सोशल मीडियावरून आपले मत मांडत असतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी २५ फेब्रुवारी २०२२ रोजी अमृता फडणवीस यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला होता. हा व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केला होता. यानंतर नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा दुर्गा डोके यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यावर भाजपा महिला कार्यकत्या आक्रमक झाल्या होत्या. ” अशोक गावडे तुम्ही अमृता फडणवीस यांची माफी मागितली नाही, तर नवी मुंबईतील आम्ही सर्व महिला तुम्हाला शहरात फिरु देणार नाहीत. महिलांना काय पण बोलाल, हे सहन केले जाणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत नवी मुंबईतील जनता तुम्हाला तुमची योग्य ती जागा दाखवून देईल. लवकर माफी मागा नाही तर मंदा म्हात्रे स्टाईलने उत्तर मिळेल,” असे भाजपा आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या होत्या.
हे ही वाचा:
आंतरराष्ट्रीय तिरंदाजाची उपसंचालक चोरमलेंविरोधात विनयभंगाची तक्रार
‘मराठी भाषा जाती- पातीत अडकून राहू नये’
हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वा. सावरकरांचा विसर
‘भारताने एक इंचही कोणाची जमीन बळकावलेली नाही’
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांच्या ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन चालू असताना नवी मुंबईतीळ महाविकास आघाडीच्या विविध मुख्य पदाधिकार्यांची भाषणे झाली त्यावेळी अशोक गावडे यांचेही भाषण झाले. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी अशोक गावडे यांनी भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर भाष्य करताना अर्वाच्य भाषा वापरली. ते म्हणाले की, “आमच्या पक्षाच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा रस्त्यावर येत नाहीत.”