नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल
भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. नवाब मलिक यांनी दिशाभूल करत जनतेमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे.
“ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भय निर्माण करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध मी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली नाही तर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार हे नक्की.” असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.
ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भय निर्माण करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध मी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली नाही तरी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार हे नक्की. pic.twitter.com/6pGCp3j9Xm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 19, 2021
शनिवारी नवाब मलिक यांनी एक पत्र आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट करत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचे ट्विट केले. यावेळी रेमडेसिवीर निर्यात करणाऱ्या एका कंपनीला फक्त गुजरात सरकारला रेमडेसिवीर पुरवण्यास मान्यता देण्यात आल्याचे म्हटले आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला. रेमडेसिवीर निर्यात करणाऱ्या एका कंपनीला फक्त गुजरात सरकारला रेमडेसिवीर पुरवण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचा कांगावा नवाब मालिकांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता. त्यांच्या या दाव्याला प्रवीण दरेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रवीण दरेकरांनी महाराष्ट्र सरकारचे पत्र ट्विट करत सरकारची पोलखोल केली होती.
हे ही वाचा:
आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक
‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य
मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून काय लिहिले?
कोरोना आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही
“नवाब मलिकांच्या जावयावर एनसीबीनं कारवाई केल्यामुळे ते केंद्रावर पिसाळल्यासारखे आरोप करतात.” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.